WTC 2023 Final : ICC चा मोठा निर्णय; WTC फायनलपूर्वी ‘हा’ नियम रद्द

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T112927.507

ICC On Soft Signal Rule :  क्रिकेटमध्ये एका मोठ्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून हा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून हा नियम हद्दपार होणार आहे. 7 जून पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. तेव्हापासून या नियमाचे अवलंबन केले जाणार आहे.

क्रिकटेमध्ये अंपायर मार्फत देण्यात येणारा सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करण्यात आला आहे. क्रिकबजच्या माध्यमातून हे वृत्त समोर आले आहे. सौरव गांगुली हा आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष असताना त्याने या निर्णयाला मान्यता दिल्याचे बोलले जात आहे. तसेच सॉफ्ट सिग्नल समाप्त करण्याच्या निर्णयाची माहिती फायनल खेळणाऱ्या भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाला देण्यात आली आहे.

Raj Thackeray : …अन्यथा पराभव ‘अटळ’; अटलजींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, राज ठाकरेंचा भाजपला सल्ला

सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय

फिल्डवरील अंपयार जेव्हा थर्ड अंपायरकडे निर्णयासाठी जातात तेव्हा ते आपला अंदाड थर्ड अंपायरला कळवत असातात. यानंतर थर्ड अंपायरला जेव्हा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुनही निर्णय घेता येत नाही तेव्हा ते फिल्डवरील अंपायरच्या सॉफ्ट सिग्नलवर आधारित निर्णय देताता.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना पुन्हा ईडीची नोटीस चौकशीला हजर राहण्याचे आदेश

या निर्णयावरुन अनेकदा वाद झालेले आहेत. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. तसेच अनेक खेळाडूंनी हा नियम रद्द करण्याबाबत भाष्य केलं होतं.

Tags

follow us