यूपी वॉरियर्सने रोखला मुंबई इंडियन्सचा विजय रथ
मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई संघाचा सलग पाच विजयानंतर अखेर पराभव झाला आहे. मुंबईचा विजयी रथ यूपी वॉरियर्सने (UP Warriors) रोखला आहे. या लीगच्या 15व्या सामन्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबईचा सामना यूपीशी झाला. या सामन्यात यूपी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet Kaur) संघ 127 धावांत गुंडाळला.
यूपी संघाने 128 धावांचे लक्ष्य 19.3 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 129 धावा करून पूर्ण केले आणि सामना 5 गडी राखून जिंकला. या मोसमातील मुंबईचा हा पहिलाच पराभव होता, मात्र त्यानंतरही हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर यूपी संघ तीन सामने जिंकून 6 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबईचा संघ 20 षटकांत सर्वबाद 127 धावांवर आटोपला. यूपीच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात वर्चस्व गाजवले आणि मुंबईच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत राहिल्या, त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. सलामीवीर हेली मॅथ्यूजने 30 चेंडूत 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 35 धावा केल्या, यास्तिका भाटियाने 7 धावा केल्या तर ब्रंटने 5 धावांवर आपली विकेट गमावली.
पंकजा मुंडेंनी गडकरींना बोलविले.. मळभ दूर झाले!
कर्णधार हरमनप्रीतने 22 चेंडूत 25 धावांची जलद खेळी खेळली, पण त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही.मुंबईकडून वांगची खेळी सर्वात स्फोटक ठरली, तिने 19 चेंडूंत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. यूपीकडून एक्लेस्टनला सर्वाधिक तीन, गायकवाड आणि दिप्तीला प्रत्येकी दोन तर अंजलीला एक यश मिळाले.
यूपीला विजयासाठी मोठे लक्ष्य मिळाले नाही, परंतु मुंबईने 27 धावांत तीन विकेट्स गमावून या संघाला अडचणीत आणले होते. यानंतर मॅकग्राने 38 धावा केल्या तर ग्रेस हॅरिसने 39 धावांची इनिंग खेळून संघाची धुरा सांभाळली. अखेरीस दीप्ती शर्माने 13 धावा केल्या तर एक्लेस्टोनने 16 धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. मुंबईसाठी अमिला केर ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने दोन बळी घेतले. दीप्ती शर्माला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.