पाकिस्तानची टीम 50 षटकेही खेळू शकली नाही, आफ्रिकेसमोर 271 धावांचे आव्हान

पाकिस्तानची टीम 50 षटकेही खेळू शकली नाही, आफ्रिकेसमोर 271 धावांचे आव्हान

World Cup 2023 : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान (PAK vs SA) संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजी करू शकला नाही. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 46.4 षटकांत 270 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 आणि कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 50 धावा केल्या. एकेकाळी पाकिस्तानचा संघ 300 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण शेवटच्या पाच विकेट 45 धावांतच पडल्या.

एकवेळ अवघ्या 141 धावांवर पाकिस्तानने पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा संघ 250 धावांपर्यंत पोहोचू शकणार नाही असे वाटत होते, मात्र त्यानंतर शादाब खान आणि सौद शकील यांनी 84 धावांची भागीदारी करत डाव सावरला. 225 धावांवर सहावी विकेट पडली आणि त्यानंतर ‘तू चल मैं आया’च्या धर्तीवर सर्व खेळाडू बाद झाले. डाव संपला तेव्हा 20 चेंडू राहिले होते. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सौद शकील आणि कर्णधार बाबर आझम यांनी अर्धशतकी खेळी केली. शकीलने 52 तर कर्णधार बाबरने 50 धावा केल्या.
Sachin Tendulkar : वानखेडेवर पुन्हा अवतरणार क्रिकेटचा देव; नगरच्या कांबळेंनी कसा साकारला पुतळा? वाचा…

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच आपला डाव सांभाळता आला नाही. 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली, तो 09 धावा करून बाद झाला. यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुसरा सलामीवीर इमाम उल हक 12 धावा काढून बाद झाला.

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दोन्ही पाकिस्तानी सलामीवीरांना आपली शिकार बनवले. त्यानंतर कर्णधार बाबर आणि फलंदाज रिझवान यांनी काही काळ डाव सावरला आणि तिसर्‍या विकेटसाठी त्यांच्यात 48 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर जी गेराल्ड कोएत्झीने 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला (31) बाद करून भागीदारी तोडली.

Sunny leone चा केनेडी झळकणार MAMI मध्ये; कान्स, सिडनीमध्येही झाला बोलबाला

त्यानंतर पाकिस्तानची चौथी विकेट 25.1 षटकात इफ्तिखार अहमदच्या रूपाने पडली, तो 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार बाबर आझम 28व्या षटकात 50 धावांवर फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीसाठी सौद शकील आणि शादाब खान यांनी सहाव्या विकेटसाठी 84 धावांची (71 चेंडू) भागीदारी करून डाव सावरला. कोएत्झीने 40व्या षटकात शादाब खानला (43) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानचा धावगती कमी केली.

त्यानंतर चांगला खेळत असलेला सौद शकील 43व्या षटकात 52 धावा काढून बाद झाला, तो फिरकीच्या जाळ्यात शम्सीने पायचीत केला. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी 02 धावा करून 10वी विकेट म्हणून बाद झाला. मोहम्मद नवाजने 24 आणि वसीम ज्युनियरने 07 धावा केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube