WPL 2023 : स्मृती मानधना असणार आरसीबीची कर्णधार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (41)

यावर्षीपासून प्रथमच किकेटच्या महिला प्रीमिअर लीगला  (Women’s Premier League)  सुरुवात होते आहे. सर्व संघांनी लिलावात आपापल्या खेळाडूंना विकत घेतले आहे. भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore)   या संघात असणार आहे. आता तिच्यावर आरसीबीच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रिकेटपटू विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसीस यांनी स्मृतीच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी आरसीबीच्या संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडून दिसत आहेत.

आरसीबीने स्मृतीवर सर्वाधिक 3.40 कोटी रुपयांची बोली लावली होती. महिला लीगच्या लिलावामध्ये स्मृती सगळ्यात महागडी खेळाडू ठरली आहे. याचबरोबर एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष हे दिग्गज खेळाडू देखील आरसीबीच्या संघात आहेत.

स्मृती मानधनाने भारतीय महिला संघाचे कर्णधार पद देखील सांभाळले आहे. तिने भारतीय संघाकडून खेळताना 77 एकदिवसीय सामन्यात 3073 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 5 शतके व 25 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-20 मधील 113 सामन्यांमध्ये 2661 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची टीम-  स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार.

Tags

follow us