WTC 2023 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत

WTC 2023 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत

WTC Final 2023 :   WTC 2023 च्या फायनलला अवघे 24 तास शिल्लक आहेत. अशातच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला सरावा दरम्यान दुखापत झाल्याचे कळते आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी फायनलपूर्वी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघामध्ये हा सामना जिंकण्यासाठी चढाओढ असणार आहे. पण त्याआधी रोहत शर्माला दुखापत झाल्याने भारतीय फॅन्स काळजीत पडले आहे. रोहित शर्मा सामना खेळणार की नाही यावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रोहित शर्मा याला सरावादरम्यान दुखापत झालीय. रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहितला सराव सोडून मैदानाच्या बाहेर जावं लागलं आहे. रोहित एकदम तातडीने मैदान सोडून गेल्यानंतर त्याची ही दुखापत गंभीर आहे, का असे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच रोहित पुन्हा मैदानात उतरला आहे.

Asia Cup 2023: पाकिस्तान आशिया कपमधून आऊट होणार ?

यानंतर, सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले असून या फोटोत रोहितच्या हाताच्या बोटांना बँडेज लावलेले आहे. पण अद्याप बीसीसीआयकडून रोहितच्या दुखपतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

विरोधकांच्या गोटात खळबळ! काँग्रेसच्या खेळीमुळे नितीश कुमारांनी ‘तो’ निर्णयच बदलला

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube