- Home »
- ahmednagar news
ahmednagar news
नगरच्या रणांगणात ‘एमआयएम’ची एन्ट्री; डॉ. परवेज अशरफींकडून उमेदवारी अर्ज दाखल
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एमआयएमतर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आजी-माजी खासदारांना आव्हान; कोण आहेत वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते?
वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी झाली आहे.
निलेश लंकेंवर संपत्तीएवढाच कर्जाचा डोंगर; 44 लाख संपत्ती अन् 37 लाखांचं कर्जच!
Nilesh Lanke Property : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Ahmednagar Loksabha) लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) तर महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंकेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना पाहायला […]
ठरलं..! उत्कर्षा रुपवते आज भरणार उमेदवारी अर्ज; वंचित आघाडीची शिर्डीत एन्ट्री
Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा निवडणुकीत आज वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक आता तिरंगी झाली आहे. वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज उत्कर्षा रुपवते सकाळी राहता येथे निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्कर्षा रुपवते यांनी मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट […]
फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला
Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनत आहे. त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्य घडवू शकणार नाहीत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, […]
‘त्यांचा पक्षांतराचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला ठाऊक’; विखेंच्या आरोपांवर पवारांचा सणसणीत टोला
Sharad Pawar replies to Radhakrishna Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार नगर शहरात आहेत. काल शहरातील गांधी मैदानात त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि जिल्ह्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत विखे यांनी केलेल्या आरोपांवर […]
शिर्डीचं गणित बदललं! उत्कर्षा रुपवते वंचितमध्ये; तिकीट मिळाल्यास ठाकरेंची कोंडी
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक (Shirdi Lok Sabha Election) असलेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पक्षाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. येथे अद्याप वंचितने उमेदवार दिलेला नाही. जर वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते […]
Ahmednagar News : धमक्यांना मी घाबरत नाही…जनता त्यांना उत्तर देईल…विखेंचा लंकेंना टोला
Ahmednagar News : दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम जेष्ठ नेते करु शकले नाही आता त्यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्त दहशत असल्याचा टोला त्यांनी लगावला. […]
जास्त परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक, कोट्यावधी रुपये घेऊन वैभव कोकाटे पसार
शेवगाव: जास्त कष्ट न करता झटपट पैसे मिळावेत अशी अनेकांची सुप्त इच्छा असते. त्यामुळेच अनेकजण शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक करतात. पण दिवसेंदिवस यात फसवणूक होण्याचे प्रकार वाढले. आताही शेवगाव (Shevgaon) तालुक्यात चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवून वैभव ज्ञानेश्वर कोकाटेने (Vaibhav Dnyaneshwar Kokate) अनेकांची फसवूक केली. […]
Ahmednagar Lok Sabha : महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांची पाठ; नगर-शिर्डीत पाटी कोरी
प्रवीण सुरवसे, (प्रतिनिधी) Ahmednagar Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा देखील केली जात आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ व नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये विचार केला असता एकाही महिला उमेदवाराला कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली […]
