- Home »
- BJP
BJP
भाजप नेते बंडखोर का होत नाहीत? ‘पॉलिटिक्स’ संपण्याची भीती की आणखी काही…
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी राजकीय पक्ष करत आहेत. पण, अशोक चव्हाण, मिलींद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला. थोडं इतिहासात डोकावलं तर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. आज हे दोन्ही […]
Pune Loksabha : पक्षाने संधी दिली तर कोण नाही म्हणतं; मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेच्या शर्यतीत कायम?
Pune Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ( Pune Loksabha ) भाजपकडून माजी महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांच्यावर लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पक्षाने संधी […]
बच्चू कडूंना ‘शिंदे सरकारची’ स्पेशल ट्रिटमेंट : जिल्हा बँकेचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी थेट कायद्यातच बदल
अमरावती : शिंदे सरकारने (Shinde government) राज्याच्या सहकार कायद्यात बदल केला आहे. त्याबाबतचे विधेयक काल (27 फेब्रुवारी) विधिमंडळात संमत करण्यात आले आहे. त्यानुसार आता एखाद्या सहकारी संस्थामधील अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची मुदत सहा महिन्यांवरुन तब्बल दोन वर्षांपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे यापुढे एकदा निवडून आल्यानंतर दोन वर्षे अध्यक्षांना कोणत्याही टेन्शनशिवाय कारभार करता येणार आहे. मात्र राज्य […]
ज्या भावना गवळींविरोधात भाजपने रान उठवले, आता त्यांच्यासाठीच PM मोदी मागणार मतं…
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
PM मोदींसाठी ‘यवतमाळ’ ठरते लकी : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (28 फेब्रवारी) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडणार आहे. यासोबतच वरोरा वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण, सलाईखुर्द तिरोरा महामार्गाविरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण, साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ […]
हिमाचलमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले; भाजपच्या हर्ष महाजन यांना राज्यसभेची ‘लॉटरी’, सिंघवी पराभूत
Rajya Sabha Elections 2024: राज्यसभा निवडणुकीतही (Rajya Sabha Elections) भाजपने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही येथे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन (Harsh Mahajan) हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यानंतर महाजन आणि सिंघवी यांना […]
देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचे निधन : 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लखनऊ : देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर रहमान बर्के (Shafiqur Rahman Barq) यांचे आज (27 फेब्रुवारी) निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. बर्क 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकीटावर संभल मतदारसंघातून निवडून आले होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना किडनीच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर आज मुरादाबादमधील एका खाजगी रुग्णालयात […]
यहाँ पे सब शांती शांती है…!!! सुजय विखे-राम शिंदे अर्धा तास शेजारी बसले पण चकार शब्दही बोलले नाहीत
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी मिळणार का? याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अशात भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तशी तयारीही शिंदे यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा […]
Maratha Reservation : मनोज जरांगेंना अटक करा, नार्को टेस्ट करा; प्रवीण दरेकरांची मागणी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे आणि चिघळलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहे. जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिले आहेत. अशात आता जरांगे पाटील यांना अटक करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी […]
मनोज जरांगेंशी काही देणं-घेणं नाही, पण त्यांचा बोलवता धनी शोधणारच : देवेंद्र फडणवीसांचा इशारा
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी, त्यांनी केलेल्या आरोपांशी आणि त्यांनी वापरलेल्या भाषेशी आपल्याला काही देणं-घेणं नाही. पण यामागचा बोलवता धनी शोधणार आहे. लाठीचार्जची घटना झाल्यानंतर कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या, कोण त्यांना रात्री त्यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यांना रात्री उठवून परत आंदोलनाला कोणी बसवले या सगळ्या गोष्टींचा शोध […]