‘ठाणे घ्या, नाशिक द्या’! शिंदेंना खिंडीत गाठून भाजपची ऑफर; गोडसेंचेही हेलपाटे थांबेनात!
नाशिक : अन् खासदार हेमंत गोडस यांनी (Hemant Godse) गत तीन आठवड्यात अकराव्यांदा एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक (Nashik) मतदारसंघातून गोडसेंची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवस उलटल्यानंतरही उमेदवारीची घोषणा होत नसल्यानं गोडसे अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शिंदेंकडे हेलापेट मारणे चालूच ठेवले आहे. अशात आता भाजपच्या एका ऑफरने गोडसेंची झोप उडाली आहे. भाजपच्या या ऑफरमुळे एकनाथ शिंदेंही टेन्शनमध्ये आले आहेत. शिंदेंना त्यांच्या घरचा मतदारसंघ हवा असेल तर नाशिक सोडा अशी ही ऑफर आहे… (If Shiv Sena wants Thane constituency, BJP should be given Nashik seat)
नेमकी काय आहे ही ऑफर? गोडसे आणि शिंदे का टेन्शनमध्ये आले आहेत? पाहुया सविस्तर…
सुरुवातीला नाशिकमधून हेमंत गोडसेच उमेदवार असणार हे जवळपास नक्की मानलं जात होतं. खुद्द मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही तशीच घोषणा केली. त्यानंतर माधव पॅटर्न अंतर्गत छगन भुजबळांचे नाव चर्चेत आले. त्यांनी तशी तयारीही सुरु केली. पण भुजबळांना जेवढा शिवसेनेचा विरोध होता तेवढाच भाजपच्याही स्थानिक पातळीवरुन विरोध होता. भुजबळ पिता-पुत्राचा दोनवेळा गोडसेंनी केलेला पराभव, मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली विरोधी भूमिका यामुळे मतदारसंघातील वातावरण भुजबळविरोधी झालं होतं.
पण खुद्द भाजपचे शीर्ष नेते अमित शहा यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यानं सारेच गार पडले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजून महिना उलटला, उमेदवारीची चर्चा होऊन तीन आठवडे झाले तरीही उमेदवारी घोषित झाली नाही. त्यामुळे भुजबळांनी वैतागून माघार घेतली. भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विद्यमान खासदार गोडसे यांच्याबरोबरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने डावलेल्या विजय करंजकर यांचेही नाव चर्चेत आले होते. दोघांपैकी एक अशी चर्चा सुरु असतानाच नवा ट्विस्ट आला.
अजित पवारांवर बोलावं इतकी आपली पात्रता नाही, उमेश पाटलांनी घेतला जानकरांचा समाचार
एखाद्याची मान पिरगळल्यानंतर ती सोडण्यासाठी त्याच्याकडून आपल्याला हवं ते वदवून घेता येतं. असंच काहीसं भाजपनं एकनाथ शिंदेंसोबत केल्याचं दिसून येतं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेची त्यातही एकनाथ शिंदे यांची मान. ठाणे लोकसभा मतदारसंघ 1996 मध्ये आनंद दिघे यांनी भाजपकडून शिवसेनेकडे खेचून आणला होता.शिवाय सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही ठाण्यातूनच येतात. मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचे मूळच ठाणे जिल्हा आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला हवाच आहे. याचाच फायदा उचलतं भाजपने शिंदेंना खिंडीत गाठलं आहे.
एकनाथ शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेही कोट्याधीश; चार वर्षांत भरघोस संपत्ती वाढली!
शिवसेनेला ठाण्याची जागा हवी असेल तर भाजपला नाशिकची जागा द्यावी किंवा नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा भाजपला द्यावी, अशी ऑफर ठेवण्यात आल्याचे समजते.
भाजपचे नेते दोन्ही जागा शिंदेना देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ निवडावा असा पेच शिंदेंपुढे तयार झाला आहे. आपण केलेल्या सर्वेक्षणात आघाडी दिसून येत असल्याने ही जागा आपल्याला हवी असे म्हणत भाजपने या जागेची मागणी केली. 1989 वगळता भाजपचा खासदार एकदाही निवडून न आल्याने जिल्ह्यात पाच आमदार असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी असा भाजपचा दावा आहे. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटानेही दहा वर्षांपासून खासदार असल्याने जागेचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून महायुतीत निर्माण झालेल्या या नवीन ट्विस्टचे काय होणार? शिवसेना जागा राखण्यात यश येणार का? गोडसेंचे हेलपाटे थांबून त्यांची उमेदवारी जाहीर होणार का? की भाजप शिंदेंना ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा देणार? हे येत्या आठ दिवसात कळून येईल.