Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 18 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित […]
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बनावट लेटरहेड, सही आणि ईमेलच्या माध्यमातून विद्युत विभागातील सहा अभियंत्यांचे बदली आदेश देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर शिंदे सरकारने सर्व अधिकाऱ्यांना अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक केले आहे. याबाबत शासन परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकारावर […]
Ashok Chavhan : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. मात्र अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वी म्हणजे एकनाथ शिंदेंसोबतच पक्ष सोडणार होते. असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. तिसऱ्या […]
पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा […]
मुंबई : बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही आज दिली. नऊ वर्षांची दुर्वा अन् नव्वद वर्षांची दुर्गा सुनील देवधरांच्या भेटीला; कारणही आहे खास राज्यातील बारा […]
बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर […]
Eknath Shinde on MVA : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकार बरखास्त करून राज्यात […]
Sanjay Raut : ठाकरे गटाकडून शिंदें गटावर सातत्याने टीका केली जातेय. आताही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट लेबर असल्याची टीका राऊतांनी केली. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समिती (lokadhikar samiti) अधिवेशनात कार्यकर्त्यांशी […]
Eknath Shinde replies Uddhav Thackeray : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या (Abhishek Ghosalkar) प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी काल पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसनेच चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित […]
Sanjay Raut Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने (Lok Sabha Election 2024) राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय पक्षांच्या तयारीने वेग घेतला आहे. दुसरीकडे गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधकांच्या हल्लाबोलाने सरकारही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]