Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी […]
Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]
Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेने लोकसभेसाठी आपल्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. आपल्या बंडात साथ देणाऱ्या १३ पैकी ८ खासदारांच्या जागा पुन्हा मिळविण्यात ते यशस्वी झाले. पुढच्य यादीत या जागांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामळे शिंदे यांनी टक्केवारीच्या भाषेत बोलायच तर पहिल्या फेरीत ६० टक्के यश संपादित केले आहे. दुसऱ्या फेरीत ते […]
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha constituency) राजकीय घडामोडींना वेग आला असून आता या घडामोडींचे केंद्र अकलूजचे मोहिते पाटील घराणे (Mohite Patil Family) राहिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांनी राष्ट्रवादीची तुतारी घेण्याची घोषणा आज केली. “भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील याचा ओढा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे. आमच्या निर्णयाची त्याला […]
Sangali Loksabha Constituency : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले. निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नवीन निवडणूक चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही […]
मुंबई : Lok Sabha Election 2024 भारतीय जनता पक्षाने (BJP) बीडमधून आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांना कोणत्याच पदावर संधी देण्याचे भाजपने टाळले होते. पण आता लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन पक्षाने केले आहे. पण त्यासाठी त्यांच्या भगिनी प्रीतम यांच्या राजकीय प्रवासाला विराम लागण्याची शक्यता […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात बारामती लोकसभेबाबत त्यांनी रोखठोक उत्तरे दिलीत. बारामती लोकसभा निवडणूक कशी असणार आहे. पक्षाची पुढील रणनिती काय असणार आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरेही सुप्रिया सुळे यांनी दिलेत.