- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
Lok Sabha Election : महाराष्ट्राची वाट खडतर! फाटाफुटीने अवघड केला निवडणुकीचा पेपर
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात (Maharashtra Politics) मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळची लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे राजकारणालाही वेगळीच धार चढली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने ४१ जागांवर विजय मिळवला होता. […]
लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात […]
‘मविआ’ अल्टिमेटमच्या बातम्यांत तथ्य नाही; वंचित आघाडीकडून स्पष्ट खुलासा
Lok Sabha Election : ‘महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणतेही अल्टिमेटम देण्यात आलेले नाही. अशी कोणतीही चर्चा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाने आमच्याशी केलेली नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. या बातमीत काहीच तथ्य नाही’, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी […]
मला धमकावणाऱ्या अजितदादांना आता माझा आवाका समजेल; शिंदेंनी समजावूनही शिवतारे ठाम
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ( Vijay Shivatare ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. आता लोकसभेच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळून येतो आहे. बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर बारामतीत आपण लढणार आणि बदला घेणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं होतं. आज पुन्हा […]
वयोवृद्ध नेत्याला एकट सोडणे, हा नालायकपणा : सख्या भावाने अजितदादांना फटकारले
Shrinivas Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अख्खं पवार कुटुंबिय त्यांच्या विरोधात गेलं. अजित पवारांनी शरद पवारांना दगा देणं हे पवार कुटुंबियांना आवडलं नाही. आता त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनीही अजित पवारांनी साथ सोडली आहे. बारामतीच्या काटेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना श्रीनिवास पवार त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी […]
Devendra Fadnavis : मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून…; फडणवीस स्पष्टचं बोलले
Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या प्रत्येक भाषणात ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. मात्र, राज्यात मविआचे सरकार आलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेतही ‘पुन्हा येईन’चा नारा दिला. त्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत (BJP) युती केली आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, आता […]
शरद पवार गटात धुसफूस? आमदार रोहित पवारांचं ट्विट तर तसेच संकेत देतंय..
Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे […]
ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र; आजच करणार शिंदे गटात प्रवेश
Uddhav Thackeray : महराष्ट्रात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच ठाकरे गटात वाद उफाळून आला. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यात धुसफूस सुरू झाली. दोघांतील वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधानपरषदेचे आमदार आमश्या पाडवी […]
अशोक चव्हाणांनी अचानक घेतली जरांगेंची भेट; दोघांत दीड तास चर्चा, कारण काय?
Ashok Chavan meets Manoj Jarange : काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची (Manoj jarange) भेट घेतली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गेवराईचा दौरा आटोपल्यानंतर चव्हाण जरांगे पाटलांच्या गावी आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला […]
राजू शेट्टी स्वबळावर ठाम, आता महाविकास आघाडीने.. उद्धव ठाकरेंच्या भेटीत नक्की काय ठरलं?
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीचा (Maharashtra Politics) जागांचा पेच अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली […]