Minister Ganesh Naik Janta Darbar CIDCO officials scold : वनमंत्री गणेश नाईक यांचे (Ganesh Naik) जनता दरबारात रौद्ररूप पाहायला मिळाले. त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना झापल्याचं (CIDCO officials) समोर आलंय. त्यांनी सिडकोने नागरिकांना पाठवलेल्या नोटिसा तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू होता. त्यावेळी नवी मुंबईसह अनेक […]
आशिष शेलार यांची निवड झाल्याची बातमी चुकीची आहे. यामुळे कार्यकर्त्यांच संभ्रम निर्माण झाला आहे असे स्पष्टीकरण आले आहे.
Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रदर्शन काल मुंबईत झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा […]
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला असता तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला.
संजय राऊत असा आव आणतात की, जणू ते स्वातंत्रवीरच. ते टीआरपी मिळवायचा आणि स्वतःचे राजकीय नाणे वाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री अकरा वाजता मी शाहांना फोम केला होता. ते कामात होते. नंतर चार मिनिटांनी त्यांचा फोन आला.
या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.
अमित शाहांना ईडीचा बांबू लावला तर ते शिवसेनेत येतील, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची स्ट्रॅटेजी सांगितली आहे.
माझं नाव जरी घेतलं तरी फडणवीस चिडतात. चिडायलाच पाहिजे. कारण, मी सत्य बोलतो. सत्य ऐकून घ्यायची त्यांची क्षमताच नाहीत.