आता प्रकरण न्यायालयात गेलं आहे. आता न्यायालय काय तो निर्णय देईल. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी वाटू लागतं की त्याला न्याय मिळालेला नाही त्यावेळी तो न्यायालयात जाऊ शकतो.
तुम्ही सीबीएसई सुरू करणार आहात मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचं काय होणार? असा सवाल खा. सुळे यांनी विचारला आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्ट शब्दांत दिलं.
चित्रा वाघ यांनी जो आकडा काढला आहे तो त्यांचं कार्यकर्तुत्व पाहता खूप कमी आहे. आता भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी संजय राठोड यांची फाईल पुन्हा ओपन करावी.
राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेत वाढीव मदत दिली जाईल असे अजित पवार म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली आहे. त्या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करील.