- Home »
- maharashtra
maharashtra
विद्यार्थ्यांचे अस्वस्थ सवाल, पवारांची आश्वासक उत्तरं; शरद पवारांनी विद्यार्थ्यांना काय सांगितलं ?
Sharad Pawar in Pune : पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना (Sharad Pawar) विविध प्रश्न विचारले. त्यावर शरद पवार यांनीही आश्वासक उत्तरे दिली. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, पुरुषोत्तम […]
‘राऊतांची वकिली चालली नाही, पक्षफुटीला नार्वेकरच जबाबदार’; बबनराव घोलपांचा गौप्यस्फोट
Babanrao Gholap Criticized Uddhav Thackeray : ‘आता उद्धव ठाकरेंच्या सेनेला माझी गरज नाही असं माझ्या लक्षात आलं. जिथं आपली गरज आहे तिथं गेलं पाहिजे म्हणून मी आता शिंदे गटात प्रवेश करत आहे. नऊ महिन्यांपासून माझ्यावर जो अन्याय झाला त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला जितके प्रयत्न करता येतील तितके मी केले. उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसैनिक पदाचा […]
‘दि पूना पोलीस सोसायटीला सहकार्य करू’ युवा उद्योजक पुनीत बालन यांचा शब्द
Pune News : मागील शंभर वर्षांहून अधिक काळ पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेली कल्याणकारी संस्था म्हणजे दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून पोलीस अधिाकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच कृतज्ञतेच्या भावनवेतून सोसायटीच्यावतीने युवा उद्योजक पुनीत बालन यांना निमंत्रित करण्यात आले होते. बालन यांनीही […]
‘काँग्रेस अन् आमच्यात फूट पाडण्याचा पटोलेंचा डाव, वरिष्ठांनी पकडल्यानंतर’.. ‘वंचित’चा दावा नेमका काय?
VBA replies Nana Patole : लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या इराद्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) उमेदवार जाहीर केले. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीवर टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) थेट अकोल्यात येत खुली ऑफर दिली होती. प्रकाश आंबेडकरांसाठी मविआचे रस्ते बंद […]
“पटोलेंचं वक्तव्य असंवेदनशीलतेचा कहर, माफी मागा”; बावनकुळेंनंतर फडणवीसही चिडले
Devendra Fadnavis replies Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) भरसभेत अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. आधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर जोरदार प्रहार केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही (Devendra Fadnavis) पटोलेंना कडक शब्दांत फटकारले आहे. पटोलेंनी महाराष्ट्र आणि अकोल्याच्या […]
“सांगली शिवसेनाच लढणार” राऊत ठाम; काँग्रेस नेत्यांची दौऱ्याकडे पाठ; वादाची ठिणगी पडलीच
Sanjay Raut on Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार […]
शिंदे मुंबईत धुरळा उडवणार! मराठमोळ्या कलाकारांची पॉलिटक्समध्ये एन्ट्री; कुणाचं नाव चर्चेत?
Lok Sabha Election : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी किंवा आमदारकी मिळवतात तेव्हाही त्यांचं ग्लॅमर असतं पण ते राजकारणी म्हणून. त्यांच्या याच ग्लॅमरचा फायदा राजकीय पक्ष घेतात अन् त्यांना उमेदवारी देतात. यातील काही स्टार्स हिट होतात तर काहींच्या नशिबी माती येते. पण, हा […]
“त्यांना माझ्या शुभेच्छा पण, निवडणुका फक्त”.. सोनवणेंना तिकीट मिळताच पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?
Pankaja Munde on Sharad Pawar NCP Candidate List : शरद पवार गटाने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता या मतदारसंघात पंकजा मुंडे आणि (Pankaja Munde) बजरंग सोनवणे यांच्यात सामना निश्चित झाला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे […]
‘साखरपुडा झाला पण, लग्न झालं नाही, हातकणंगलेची चर्चा कुठं अडली?’ सतेज पाटलांनी काय सांगितलं?
Congress MLA Satej Patil on Hatkanangale Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर (Uddhav Thackeray) त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. […]
काँग्रेसला टोचणारी ठाकरे-राऊतांची दोन वक्तव्ये; ‘सांगली’ काँग्रेसच्या हाताला लागणार नाही?
Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी […]