मला जर कुणी विष खाऊ घालत असेल तर मी काय त्याची पूजा करू का, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही.
शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी आमदार निवासातील कँटीनमध्ये राडा घातला.
रोजगाराच्या शोधात उत्तर भारतातील विविध प्रांतांतून लोक मुंबईत आले आहेत. या लोकांना मारहाणीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण अधिक चिघळत चालल्याचे लक्षात येताच दोन तासांनंतर या मोर्चाला परवावगी देण्यात आली.
मी स्वतः मोर्चात सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी माझी चूक मान्य करतो आणि माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन.
म महापालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्रही आता काबीज करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही.