कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अजितदादांचं कौतुक केलं.
माझ्या नादी लागू नका, माझं मोहोळ उठलं तर तुमच्याही सभा होऊ देणार नाही, असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला.
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्या प्रकरणी न्यायालयाने नितेश राणेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
रोहित पवार यांनी आरोप केला असेल मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे हे आपल्या घरातील वरिष्ठ माणसांना विचारा असे प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिले.
मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही.