- Home »
- Politics
Politics
“भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे”; कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर ‘राष्ट्रवादी’चा संताप
Anil Deshmukh Criticized BJP over Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता […]
‘राम शिंदेंची मैत्री, विखेंना विरोध अन् अमोल कोल्हेंना आमंत्रण’; आ. लंकेंच्या मनात नेमकं काय?
Nilesh Lanke : नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चाणाक्ष आमदार म्हणून निलेश लंके (Nilesh Lanke) ओळखले जातात. शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात करणारे निलेश लंके आता आमदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे यांना भाजप पुन्हा तिकीट देईल अशी […]
Lok Sabha Election : राजकारणातील स्टार्स! काहींचं ‘पॉलिटिक्स’ हिट तर काहींचं करिअरच ‘ब्रेक’
Lok Sabha Election : देशात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास (Lok Sabha Election) सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र नेते मंडळींकडून दबावाचे पॉलिटिक्स सुरू आहे. या लोकांनी कितीही दबाव आणला तरीही संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित पाहूनच तिकीट फायनल होणार […]
Jitendra Awhad : “पुतण्या गद्दार निघाला!” आव्हाडांची जहरी टीका; मिटकरींचाही पलटवार
Jitendra Awhad vs Amol Mitkari : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर तुटून पडले आहेत. अजितदादांवर घणाघाती टीका केली जात आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर असून जोरदार प्रहार करत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करत टोचणारी टीका केली. ही टीका अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली […]
‘इन्स्टाग्राम’चा राजकीय कंटेटला ब्रेक! लोकसभा निवडणुकांआधी नेते अन् पक्षांना मोठा धक्का
Instagram Threads to Stop Promote Political Content : निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. आजच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा दबदबा आहे. फेसबूक, ट्विटर, इन्टाग्राम आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर राजकारणाचा बार उडालेला दिसतो. एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची किमया सोशल मीडियाने साधली जात आहे. सभा, मेळावे सुद्धा लाईव्ह होतात. राजकीय शब्दांचे वार-पलटवारही येथेच दिसतात. मात्र,आता अशी एक बातमी […]
Narayan Rane : खासदाराचा सोपा प्रश्न पण, उत्तर देताना राणे गडबडले; राज्यसभेत नेमकं काय घडलं?
Narayan Rane : राज्यसभेचं कामकाज सुरू आहे. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याची नेमकी उत्तरं मंत्री देतात. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतीत राज्यसभेत (Rajya Sabha) वेगळाच किस्सा घडला. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुसरंच उत्तर दिलं. आता त्यांना प्रश्न समजला नाही की त्यांनी खरंच वेगळं उत्तर दिलं याचं लॉजिक समोर आलं नाही. मात्र, विरोधकांनी […]
सरकारला सोडणार नाहीच! सगेसोयऱ्यांच्या कायद्यासाठी शनिवारपासून उपोषण; जरांगेंची घोषणा
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) केलेल्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. त्यानंतर आता राज्यात सुमारे 54 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही (Maratha Reservation) झाले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज करावेत. सगेसोयऱ्यांसंदर्भात सरकारने कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी मनोज […]
‘400 च काय 200 जागाही अशक्य, प्रभू श्रीराम भाजपाला माफ करणार नाही’; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीशी (Nitish Kumar) फारकत घेत भाजपाशी घरोबा केला. दोन दिवसांपू्र्वी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. आता त्यांच्या नेतृत्वात भाजप-जेडीयू सरकार सुरळीत सुरू झाले आहे. दुसरीकडे मात्र नितीश कुमार यांच्या या राजकारणाचा विरोधी पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. आताही ठाकरे गटाचे खासदार संजय […]
अजितदादांसमोरच मुश्रीफांच्या डोळ्यांत पाणी; राजकारणातील संकटांचा उल्लेख करताना अश्रू अनावर
Hasan Mushrif : ‘आतापर्यंत जनतेने मला सहा वेळा निवडून दिले. आता माझी सातवी निवडणूक असेल. राजकीय जीवनात वावरताना माझ्यावर दोन वेळा राजकीय संकट आली परंतु, मतदार पाठिशी असल्यामुळे मी दोन्ही संकटं पेलून नेली’, अशा शब्दांत वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कटू अनुभव सांगितला मात्र हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या […]
महायुतीच्या मेळाव्याला आमदार निलेश लंकेंची दांडी, मी येणार होतो पण…
Ahmednagar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections)अनुषंगाने नगर शहरात महायुतीचा महामेळावा (Mahayuti Mahamelava)पार पडला. या मेळाव्याला महायुतीचे अनेक नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते, मात्र या महामेळाव्याला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)हे अनुपस्थित होते. यावर आता त्यांनी भाष्य केले आहे. मेळाव्याचे निमंत्रण मला आले होते मात्र मी काही कारणास्तव बाहेर गावी असल्याने मेळाव्याला येऊ […]