मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचे सचिव दिनेश बोभाटे (Dinsesh Bobhate) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे या समन्समध्ये सांगितले आहे. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना तर बेहिशोबी संपत्ती प्रकरणात बोभाटे यांना समन्स पाठविण्यात […]
मुंबई : भाजपनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान पाच खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात […]
Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adhalrao Patil ) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी आढळराव यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी यावेळी वैयक्तिक हेवेदावे नाही पण राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतच असं म्हणत मोहिते पाटील आणि आपल्या संबंधांवर स्पष्टीकरण […]
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. प्रवेशानंतर निरुपम यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या जागी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गतवेळी याच मतदारसंघात कीर्तीकर यांनी निरुपम यांचा […]
Shivajirao Aadhalrao : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. ( Shivajirao Aadhalrao ) परंतु, आढळराव शिंदे गटात होते. मग काय, दोन्ही गटांनी विरोध बाजूला सारला आणि आढळरावांचा पक्षप्रवेश नक्की झाला. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आढळरावांवर एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
नाशिक : नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे तसे शांत आणि संयमी समजले जातता. आधी मनसे आणि आता शिवसेना (Shivsena) अशा पक्षांमध्ये काम करुनही गोडसे इतर आमदार-खासदारांप्रमाणे कधी आक्रमक झालेले ऐकीवात नव्हते. गत दोन दिवसांपासून मात्र ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या […]
Shivsena Shinde Group Loksabha Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कालच भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाल्यानंतर आज लगेचच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) उमेदवारांची संभाव्य यादी करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून धक्काच दिला आहे. शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना […]
Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली होती. मनसे शिवसेनेत (shivsena) विलीन करा आणि शिवसेनेची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता कॉंग्रेसला सीट विकतात; आमदार […]
MLA Raju Parwe Join Shivsena : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती […]