Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आपल्याकडे 1999 नंतरच्या घटनादुरुस्तीचे पुरावेच आले नसल्याचं घोषित केलं होतं, मात्र, शिवेसेनेत 2013 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीच्या ठरावाप्रसंगी खुद्द राहुल नार्वेकरच उपस्थित असल्याच्या पुरावा उद्धव ठाकरे गटाकडून थेट पत्रकार परिषदेतच दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीच्या ठरावाला राहुल नार्वेकरांनी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिष्टमंडळ हे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जात आहे. पण या दौऱ्याच्या खर्चावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी खर्चावरून व शिष्टमंडळात असलेल्या व्यक्तींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) […]
Loksabha Election 2024 : मुंबईः शिवसेना फुटल्यामुळे अनेक आमदार, खासदार, माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे पक्ष व चिन्ह हिरावून घेणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना खिंडीत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनेक जणांचे नावे चर्चेत आहे. त्यात आता उद्धव ठाकरे […]
Disqualification Mla : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारही पात्र आहेत. असा निर्णय नार्वेकरांनी दिला. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा दावोस दौरा वादात सापडला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली ते स्वतःच्या खर्चाने सरकारला मदत करण्यासाठी दावोसला गेले आहेत, त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय राज्य शासनाच्या तिजोरीतून ज्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, त्या पै-पैचा […]
धाराशिव : “2019 ते 2024 यादरम्यान आपण अपघाताने खासदार झालात. कोणाला तरी फसवून, धोका देऊन खासदार झालात. या माझ्या 11 लाख जनतेसाठी केंद्रातली आपण आणलेली एक योजना दाखवा. म्हणेल ती पैज हरायला तयार आहे”, असे आव्हान देत आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर टीका […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकतच कॉंग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्य बाण हाती घेतला. देवरांपाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान हेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (State Working President Naseem Khan and Basavaraj Patil are preparing to leave the […]
Milind Devora On Congress : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Devora) यांनी आज काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एक पत्र काढून देवरा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणे, पक्षाचा सुरू असलेल्या कारभारावर देवरा यांनी सडकून टीका केली […]
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तब्बल 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका मदतीची आठवण ठेवत आपल्या जुन्या मित्राला श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण पाठविले आहे. डॉ. भरत बरई (Bharat Barai) असे या मित्राचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासाठी व्हिसा क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी डॉ. बरई यांनी महत्वाची […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्य बाण हाती घेतला. देवरा यांच्याबरोबर दहा माजी नगरसेवकांनाही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार गजानन किर्तीकर, उद्योगमंत्री […]