- Home »
- Shivsena
Shivsena
Rahul Narvekar यांच्या प्रतिमेला जोड्यांचा आहेर, निकालांनंतर ठाकरे गट आक्रमक
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर […]
नार्वेकरांच्या पाच चुका ठाकरे गटाने पकडल्या… याच मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात होणार खल!
कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही. भरत गोगावलेंची व्हीप पदी केलेली नियुक्ती अवैध. पक्षाध्यक्षांशी चर्चा करुन व्हीप ठरवावा, राहुल नार्वेकर यांच्या निकालावर निवडणूक आयोगाच्या निकालाचा कोणताही परिणाम व्हायला नको. याच निरीक्षणांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये शिवसेनेच्या बहुचर्चित सत्तासंघर्षाचा निकाल दिला होता. पण हेच सर्व निर्णय फिरवत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये फरक; बाजू भक्कम म्हणत भुजबळांनी निकालच सांगितला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये थोडाफार फरक आहे. तिकडे व्हीप बदलले, असंख्य गोष्टी आहेत. आमच्या इथे ती परिस्थिती बदलली नाही. आमचा व्हीप तोच आहेत. व्हीपच्या बाबत असंख्य गोष्टी फिरत होत्या. आमची बाजू भक्कम आहे. असं म्हणत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लढाईचा निकालच सांगून टाकला आहे. ते माध्यमांशी बोलत […]
भाजपमध्ये स्थिरावलेल्या नार्वेकरांनीही दोनदा ठोकला आहे राजकीय पक्षांना रामराम
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
भाजपने डोळे दाखवताच अजितदादा नरमले; चंद्रकांतदादांनी प्रस्तावित केलेली सर्व कामे मंजूर
पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली मात्र अडविण्यात आलेली कामे अखेर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी मंजूर केली आहेत. याशिवाय शिवसेनेच्या (Shivsena) सदस्यांनाही त्यांच्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर होणारा भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष […]
“दोन्ही दादांच्यामध्ये आमचे मरण…” : गोऱ्हेंनी विषय छेडताच अजितदादांनी मार्गी लावली शिवसेनेची कामे
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मागील काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात वादाची ठिणगी पडली होती. अजित पवार गटाच्या आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) सदस्यांनी यापूर्वीच आक्षेप घेतले होते. अखेर काल (10 जानेवारी) या वादावर पडला असून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
‘खरा निकाल लागलाच नाही, आता या प्रवृत्तीविरुद्ध…’; आंबेडकरांचे आमदार अपात्रता निकालावर भाष्य
Prakash Ambedkar on Shiv Sena MLAs disqualification : गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLAs disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. या […]
आजचा निकाल स्क्रिप्टेड, महाशक्तीच्या आदेशानुसार नार्वेकरांचा निर्णय; कॉंग्रेस नेत्यांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाशक्तीच्या […]
नार्वेकरांनी दिलेला निकाल हा दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट; पटोलेंची सडकून टीका
Nana Patole : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज दिलेला निर्णय हा महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते. पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनही यावेळी […]
MLAs disqualification : आजचा निकाल म्हणजे राजकीय निवाडाच; शरद पवारांची जळजळीत टीका
Sharad Pawar On Shiv Sena MLAs disqualification : गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLAs disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवलेत. तसंच शिवसेना (Shivsena) ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केलं. या […]