काल राज्यात काही ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करून 13 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली.
विजयसिंह मोहिते पाटलांनी जिथून कपडे घेतले त्याच ठिकाणाहून मला वडिलांनी कपडे आणून देत तूला आमदार व्हायचंय, असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय.
सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत आहेत मात्र एकाही आमदाराला फोन आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या 32 संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे.
करमाळ्यात शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. तरी देखील अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कडक इशाराच दिलायं. ते सोलापुरात बोलत होते.
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच.