राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती.
आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Rain Alert) पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान वि भागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर असा पाऊस सुरू झाला आहे.