Maharashtra Politics : आता ‘हे’ असणार शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय, पक्षाच्या पत्रकात दिला पत्ता

Shivsena Karyalay

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर आता शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार ? शिवसेनाभवनावर शिंदेंकडून हक्क सांगितला जाणार का ? या सगळ्या प्रश्नांमध्ये आता शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार आहे ? हे समोर आलं आहे.

सचिव संजय मोरे यांनी पक्षाचं एक पत्रक काढलं आहे. यामध्ये त्यांनी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना म्हटले जाऊ नये. आम्हाला ‘शिवसेना’ म्हणावे. असं स्पष्ट केलं आहे. तर यामध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता ‘आनंद आश्रम ठाणे’ असा देण्यात आला आहे. आनंद आश्रम हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे. याच ठिकाणी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे. हे आता या पत्रकावरून स्पष्ट झालं आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मालमत्ता, संपत्तीचा मोह नाही

दरम्यान शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवनावर (Shivsena Bhawan)शिंदे गटाकडून दावा केला जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचं सोमवारी स्पष्ट केलं होतं. शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्ता आणि संपत्तीवर दावा केला जाणार नाही. मालमत्ता आणि संपत्तीचा मोह नाही, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

त्यानंतर आता शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार ? शिवसेनाभवनावर शिंदेंकडून हक्क सांगितला जाणार का ? या सगळ्या प्रश्नांमध्ये आता शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार आहे ? हे समोर आलं आहे. आनंद आश्रम हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचं निवासस्थान आहे. याच ठिकाणी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे. हे आता या पत्रकावरून स्पष्ट झालं आहे.

Tags

follow us