‘…तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवलेच करू शकतात’, अंधारेंचा आंबेडकरांना खोचक टोला
Sushma Andhare : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतेच एक मोठे वक्तव्य केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा स्ट्राईक रेट उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त असून शिवसैनिकांना त्यांचीच शिवसेना खरी मानतो, असं विधान त्यांनी केलं होते. त्यांच्या वक्तव्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.
पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला, सुपारीबाज…; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवले साहेबच करू शकतात, असा खोचक टोला अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
स्ट्राईक रेट सारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे याचा अर्थ नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेबच करू शकतात ..! @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 5, 2024
सुषमा अंधारेंनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्या म्हणाल्या की, स्ट्राईक रेट सारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरवत असेल तर मग आरपीआय चळवळीला एकमेव माणूस सातत्यानं खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे याचा अर्थ नेतृत्व फक्त आठवले साहेबच करू शकतात, असं अंधारे म्हणाले.
Lakshya Sen : भारताला धक्का, लक्ष्य सेनचा पराभव, कांस्यपदक हुकले
म्हणून आंबेडकर राजकारणात वंचित…
तर प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. पण त्यांची प्रज्ञा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हरवलेली असते. ती अशीच हरवते म्हणून प्रकाश आंबेडकर कायमचे राजकारणात वंचित राहिले, दुसऱ्यांच्या पायात खोडा घालणं एवढचं त्याचं काम आहे, अशी टीका अरविंद सामंत यांनी केलीय
आंबेडकर काय म्हणाले?
आज एका सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की,उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ दुप्पट आहे. याचा अर्थ असा की, शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो. ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा आरक्षण आणि मुस्लीम समाजामुळं वाढला, असं ते म्हणाले.