भाजपमधील पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले. पण कमळ हाती घेणे पिचडांना फायद्याचे ठरले नाही. आमदारकी गेलीच पण स्थानिक निवडणुकांमध्ये पिचडांना राष्ट्रवादी हिसका देत आहे. पिचडांना अद्दल घडविणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एका सभेत बोलवून दाखविले होते. आता हे खरे ठरत असल्याचे दिसत आहे.
राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमधील काही निकालांचा आढावा आपण घेऊ
Sadabhau Khot : ‘आज आम्ही जरी भाजपबरोबर असलो तर आम्ही सत्तेसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांचा राजकीय अजेंडा चालला आहे. आमचा अजेंडा मात्र शेतकरी, ग्रामीण भागातील जनता आणि त्यांच्या समस्या हा आहे. हाच अजेंडा पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत. आमच्याच सरकारविरोधात आंदोलन केले तरी कधी देंवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांचा फोन येत नाही. […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवारांचे नाव सुचवले. राष्ट्रवादीत खरेच भाकरी फिरली का? अशीही चर्चा सुरू
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी शरद पवार, राजू शेट्टी ते शेतकरी चळवळीसह राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.
तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात प्रवेश करत तीन सभा घेतल्या आहेत. या तिन्ही सभा मराठवाड्यात झाल्या आहेत. याचा कोणत्या पक्षाला फटका बसेल हे या व्हिडिओतून जाणून घेऊया…