नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]
नागपूर : पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामुळे कोकणातील गावांना अनेक बंधने पडली आहेत. कोकणातील गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण केले गेले असून त्यानुसार पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून एकूण 388 गावे वगळण्याचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. याविषयावर आमदार श्री भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर […]
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
सांगली : जिल्ह्यातील खानापूर आटपाडी या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर असतील तर आपण स्वतः महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी एक व्हिडीओ शेअर करत केली आहे. व्हिडीओमध्ये सचिन खरात म्हणाले की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्देचे अनेक प्रकार देशासह राज्यातील काही भागांत याआधी समोर आलेले आहेत. याविरोधात अनेकांनी प्रयत्न करुन असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अनेकदा नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. अंधश्रध्देविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रगतशील समाज कायम अग्रेसर राहीला आहे. अशातच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एका पेटत्या चिते […]
नगर : नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार असा प्रश्न विचारत राज्य सरकारचे लक्ष वेधले. लक्षवेधी काळात रोहित पवार यांनी राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, उदय सामंत हे युवा मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांच्या आशा त्यांच्याशी जोडलेल्या […]