Chhattisgarh Election : भाजप जिंकला तर छत्तीसगडचा CM कोण? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

Chhattisgarh Election : भाजप जिंकला तर छत्तीसगडचा CM कोण? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

Chhattisgarh Election Results 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात छत्तीसगडमध्ये भाजपा (Chhattisgarh Elections) आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप काँग्रेसची (Congress) सत्ता उलथवून लावणारा का, याचे उत्तर थोड्याच वेळात मिळेल. मात्र, तरीही प्रत्येक पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. सध्याच्या अंदाजानुसार राज्यात अनपेक्षितपणे भाजपला (BJP) आघाडी मिळतानात दिसत आहे. सत्ताधारी काँग्रेसची (Congress) पिछेहाट होताना दिसत आहे. छत्तीसगडची जनता कुणाला सत्ताधीश करणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. त्यानंतर आता जर भाजप सत्तेत आला तर कोण मुख्यमंत्री असेल याची चर्चा सुरू झाली आहे. (Chhattisgarh Election Results 2023)

या राज्यातही भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कुणालही पुढे केलेलं नव्हतं. दुसरीकडे काँग्रेसने मात्र विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनाच पुढे करत निवडणूक लढली होती. भाजप पीएम मोदींच्या भरवशावर निवडणुकीत होता. सुरुवातीचे जे कल हाती आले आहेत त्यातून राज्यात भाजपा सत्तेत येईल अशीच चिन्हे दिसत आहेत. आता या परिस्थितीत भाजप कुणाला मुख्यमंत्री बनवणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

Rajasthan Elections : ..तर PM मोदीही वसुंधराराजेंना रोखू शकणार नाहीत; राजस्थानचं गणितच बदललं

सलग तीन टर्म मुख्यमंत्री राहिलेले रमण सिंह भाजपाची पहिली पसंत ठरू शकतात. किंवा आदिवासी समाजातील कुणाला मुख्यमंत्री केले जाणार का असा प्रश्न आहे. भाजप महाराष्ट्र आणि हरियाणा मॉडेलप्रमाणे येथेही डाव टाकू शकते. तिकीट वाटपापासून सर्व महत्वाचे निर्णय भाजप श्रेष्ठींनीच घेतले. त्यामुळे कोणत्या एका नेत्यासाठी लॉबिंग होताना येथे दिसले नाही.

विजय बघेल

मुख्यमंत्रीपदासाठी विजय बघेल यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. विजय बघेल हे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यात कूर्मी समाजातून येतात. विजय बघेल यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची आहे. त्यांना स्थानिक नेत्यांचाही विरोध नाही. वरिष्ठ नेतृत्वाचेही विश्वस्त मानले जातात. राजकीय जाणकारांच्या मते त्यांच्या विरोधात एकच गोष्ट जाऊ शकते ती म्हणजे पूर्ण राज्यात त्यांची ओळख नाही.

रमण सिंह 

सलग तीन टर्म मुख्यमंत्री राहिलेले रमण सिंह यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने त्यांच्याकडे नक्कीच दुर्लक्ष केले होते. पण नंतर निवडणुका जशजशा जवळ आल्या तसे तिकीट वाटपात नेतृत्वाने त्यांचंही ऐकलं. केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहे की रमण सिंह सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना राज्य चालविण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांची लोकप्रियताही राज्यात आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या योजना जनमानसात चांगल्याच लोकप्रिय ठरल्या होत्या.

Telangana Election Result : ABVP तून सुरुवात, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश, CM पदाचा चेहरा रेवंत रेड्डी नेमके कोण?

अरुण साव 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सावही शर्यतीत आहेत. अरुण साव ओबीसी समाजातून येतात. भाजपला सध्या एक स्वच्छ चारित्र्याचा आणि नेतृत्वाचं ऐकेल असा माणूस मुख्यमंत्री म्हणून हवा आहे. त्यात अरुण साव फिट बसतात. राज्यातील जातीय समीकरणातही ते फिट बसतात. त्यामुळे कदाचित त्यांचं नाव पुढं आलं तर आश्चर्य वाटायला नको.

ओपी चौधरी 

ब्युरोक्रॅट ओपी चौधरी यांनी 2018 च्या निवडणुकीआधी नोकरीतून राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. चौधरी युवकांत लोकप्रिय आहेत. सोशल मीडियातही त्यांचा मोठा फॉलोअर्स आहेत. ओपी चौधरी सुद्धा ओबीसी समाजातून येतात. राजकारणात एक नवा विचार घेऊन ते आले आहेत. त्यांच्याकडे राजकारणाचा फारसा अनुभव नाही. तरी देखील भाजप त्यांचाही विचार करू शकते. या व्यतिरिक्त सीएम पदासाठी आदिवासी चेहऱ्याचाही विचार होऊ शकतो. राम विचार नेताम यांचं नाव यात आघाडीवर दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube