Rajasthan Elections : ..तर PM मोदीही वसुंधराराजेंना रोखू शकणार नाहीत; राजस्थानचं गणितच बदललं

Rajasthan Elections : ..तर PM मोदीही वसुंधराराजेंना रोखू शकणार नाहीत; राजस्थानचं गणितच बदललं

Rajasthan Elections : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राजस्थानात भाजपा (Rajasthan Elections) आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप काँग्रेसची (Congress) सत्ता उलथवून लावणारा का, याचे उत्तर थोड्याच वेळात मिळेल. मात्र, तरीही प्रत्येक पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होताना दिसत आहे. राजस्थानात यंदा भाजपने पूर्ण ताकद लावली होती. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे (Vasundhara Raje) या देखील प्रचारात सक्रिय दिसल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाच्या स्टार प्रचारकांनी राज्यात सभा घेतल्या. आता जर राज्यात भाजप सत्तेत आला तर मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तर जंग जंग पछाडल्यानंतरही भाजपला दुसरा चेहरा सापडल्याचे दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून वसुंधरराजे शिंदे यांचेच नाव पुढे येत आहे. (Rajasthan Elections)

Rajasthan Elections : वसुंधरा राजेंचा अपक्षाला फोन, काँग्रेसही अलर्ट; राजस्थानात काय शिजतंय ?

राजकीय जानकारांच्या मते राजस्थान निवडणूक जरी वसुंधरा राजे यांच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या नसल्या तरी भाजप सत्तेत आल्यास पीएम मोदी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखू शकत नाहीत. ऐनवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या रणनितीत बदल केल्याचे सांगण्यात आले. 199 मधील 65 भाजप उमेदवार वसुंधराराजे यांचे कट्टर समर्थक आहेत. या उमेदवारांकडे दुर्लक्ष करणे भाजप नेतृत्वालाही परवडणारे नाही. राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की यंदा वसुंधराराजे यांनी सुद्धा फक्त याच 65 उमेदवारांसाठी प्रचार केला होता. तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार महंत बालकनाथ आणि बहरोड येथील जसवंत यादव यांनी वसुंधराराजे यांची वकिली केली आहे.

तर वसुंधरारराजेच मुख्यमंत्री 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी आरएसएसने ऐनवेळी रणनितीत बदल केला आहे. वसुंधराराजे यांच्या व्यतिरिक्त दुसरा दमदार चेहरा मिळाला नाही. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की सीएम पदासाठी वसुंधराराजे यांनाच आरएसएसची पहिली पसंती आहे. याआधी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, दीया कुमारी यांना पुढे करण्यात आले होते. मात्र हे दोघेही वसुंधराराजे यांच्या करिष्म्यापुढे फिके पडले. विशेष म्हणजे दीया कुमारी यांनी पक्षातूनच विरोध होता. वसुंधराराजे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट न करण्याची रणनितीही आरएसएसचीच होती. परंतु, मागील सहा महिन्यात वसुंधराराजेंनी जबरदस्त वापसी केली. जर भाजप सत्तेत आला तर वसुंधराराजे मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित आहे. (Rajasthan Elections)

Rajasthan Election 2023 : काँग्रेसने खेळले महिला शक्ती कार्ड, 33 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 9 महिलांना तिकीट

राजस्थानात 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राज्यात दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होते. येथील जनतेने कुण्या एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता दिलेली नाही. आता हा ट्रेंड कायम राहणार की बदलणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. सन 1993 पासून दर पाच वर्षांनी आलटून पालटून सत्ता येण्याचा कल राहिला आहे. यावेळी दोन्ही पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे. त्यामुळे राजस्थानची जनता कुणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube