धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शब्द
Sambhajirao Patil Nilangekar : धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी (Sambhajirao Patil Nilangekar) धनगर समाजबांधवांना दिलायं. वलांडी येथे आज धनगर समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात धनगर समाजबांधवांकडून निलंगेकरांचा सन्मान करण्यात आलायं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असा शब्दच निलंगेकरांनी दिला आहे. या मेळाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर काठी, घोंगडी बांधून निलंगेकरांचा सत्कार करण्यात आला.
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा, सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन
यावेळी बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप आ.निलंगेकर यांनी केला. ही चूक महायुती सरकारने दुरुस्त केली. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मी विधानसभेतही आवाज उठवला होता.भविष्यात महायुती सरकारच सत्तेत येणार असून या समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असं निलंगेकर म्हणाले आहेत.
काँग्रेसला डबल धक्का! रवी राजांनंतर विद्यमान आमदाराचाही पक्षाला रामराम; शिवसेनेत प्रवेश
होळकरांकडून हिंदु संस्कृती जतन करण्याचं काम…
मुघल सरकारने हिंदू संस्कृती मोडून काढली. ती जतन करण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षात काँग्रेसला त्यांचा सन्मान करता आला नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा योग्य तो सन्मान केला. राज्य सरकारनेही सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले तर अहमदनगरचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आल्याचे निलंगेकरांनी स्पष्ट केलंय.
भाजपचा उमेदवार पण, चिन्ह धनुष्यबाण अन् घड्याळ; ‘त्या’ मतदारसंघांत खास प्लॅन!
धनगर समाजाला राजकीय सन्मान…
निलंगा मतदारसंघात समाजाला योग्य तो सन्मान देण्याचे काम आपण केले आहे.या समाजाला राजकीय पाठबळ दिले.निलंग्याच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती म्हणून शिवाजीराव चेंडकापुरे, लातूरच्या उपमहापौरपदी देविदास काळे यांना संधी दिली.यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मतदारसंघातील गौडगाव येथे अहिल्यादेवींचा पुतळा उभारला.केळगाव व देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथे लवकरच पुतळे उभारले जाणार आहेत.निलंगा शहरात अहिल्यासृष्टी उभारून समाजाचा सन्मान करण्याचे काम आपण केले असल्याचं निलंगेकरांनी स्पष्ट केलंय.
यावेळी विजयकुमार भोसले, अरविंद पाटील निलंगेकर, संजय दोरवे, दगडू सोळुंके, बाळासाहेब शिंगाडे, काशिनाथ गरीबे, देवबा काळे,लक्ष्मण जागले, आण्णाराव गोबाडे, प्रकाश म्हेत्रे, प्रकाश कोटे, तुकाराम काळे, ब्रह्माजी भोसले, विजयकुमार जागले, नामदेव काळे,नागेश तरंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.