नेहमीच सभासद अन् शेतकऱ्यांचे हित जपले; भीमाशंकर अन् ‘माळेगाव’ ची तुलना नको – वळसे पाटील
मंचर : आम्ही विश्वस्त म्हणून काम करत असताना नेहमीच सभासद व शेतकरी हित जपले आहे. त्यामुळे भीमाशंकर आणि माळेगाव कारखान्याची तुलना नको असे आवाहन महायुतीचे उमेदवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आहे. ते पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत बोलत होते.
जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “पिंपळगावामध्ये सुरुवातीला फक्त श्रीराम डेअरी होती. त्यानंतर नदी, कालव्याचे पाणी पिंपळगावला मिळाले. गावातली शेती सुधारली. घरं, बंगले बांधले. आता जीवनमान उंचावले आहे. काही जण बाजारभावाच्या बाबतीत भीमाशंकर कारखान्याची तुलना माळेगाव कारखान्याशी करत आहेत. परंतु भीमाशंकर सहकारी कारखाना हा सुरुवातीपासून सभासद व गेटकेनला एकच बाजारभाव देत आहे. तसे माळेगाव कारखाना करत नाही. त्यामुळे बाजारभावावर बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.
आम्ही विश्वस्त म्हणून काम करत असताना नेहमीच सभासद व शेतकरी हित जपले आहे. कर्ज काढून कारखाना काटकसरीने चालवावा लागतो असेही वळसे पाटील म्हणाले. आपण गेले ३५ वर्षात तालुक्यात विकास कामे करत असताना संस्था उभारल्या त्या संस्थांमध्ये दोन हजारापेक्षा जास्त तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
विकास कामांमुळे आंबेगावची विशेष ओळख : दिलीप वळसे पाटील
पिंपळगावातील कॉक्रिटीकरणासाठी कोटींचा निधी आपण मंजूर केला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर नागरिकांना फायदा होईल. तसेच गावातील श्रीराम हायस्कूल इमारतीचे कामदेखील मार्गी लावले आहे. आपण उभारलेल्या अवसरी खुर्द येथील अभियांत्रिकी व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमुळे गोरगरीब शेतकऱ्यांची मुले तेथे उच्च शिक्षण घेत आहेत. ही महाविद्यालये कायमस्वरूपी राहणार आहे.
शाश्वत विकासकामांमुळे आपला अष्टविजय निश्चित; वळसे पाटलांना पूर्ण विश्वास
कोल्हेंचा नकाला करणे अन् वल्गना करणे हाच व्यवसाय
लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी वेगळा विचार केला. अमोल कोल्हे यांना निवडून दिले, त्यानंतर हे खासदार मतदारसंघात दिसलेच नाही. केवळ वल्गना, नकला करणे हाच त्यांचा व्यवसाय आहे. या विधानसभा निवडणुकीत मात्र आम्ही शिवसेना, भाजपा कार्यकर्ते इतर घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनाच मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे असे राष्ट्रीय कार्यकारिणी युवा सेनेचे सचिन बांगर यांनी सांगितले.
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक धोंडीभाऊ बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर, अरुणा थोरात, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संचालक नीलेश थोरात, अरुण बांगर, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, संदीप बांगर, जे. के. थोरात, सरपंच आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.