EVM हॅक करता येतं I Know दॅट, आयएम अल्सो द इंजिनिअर; जानकरांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : राज्यात विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा सगळीकडे ईव्हीएम (EVM) मशीन चर्चेत आलेल्या असतानाच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी EVM हॅक करता येत आयएम अल्सो द इंजिनिअर आय नो दॅट असे म्हणत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (Mahadeo Jankar On EVM Hacking)
Video : EC म्हणजे कुत्रा; टीकेच्या ओघात काँग्रेस नेते भाई जगतापांचे बोल बिघडले
माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले की, अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला आजिबात पडायचं नाही. मात्र, अनेक ठिकाणी EVM मध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी जानकर यांनी केला.
CM पदासाठी भाजपाचं धक्कातंत्र? मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, मोहोळांनीही क्लिअरच केलं..
ते म्हणाले की, EVM हॅक करता येत आयएम अल्सो द इंजिनिअर आय नो दॅट असे म्हणत सर्व काही हॅक करता येतं. प्लेन हॅक करता येत तर हे का नाही. त्यामुळे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर, त्यांनी बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणवी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे स्वागत करू.
अखेर, महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ तर शिंदे – पवारांच्या पारड्यात काय?
तीन उमेदवारांना समान मतदान कसं पडतं?
साताऱ्यात तीन उमेदवारांना समान मतदान कसं पडतं असा सवालही जानकरांनी उपस्थित करत हे काय गौडबंगाल आहे समजत नाही. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर, ईव्हीएम बॅन करा अशी मागणी करत सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग यासह सर्व चारही स्तंभ केंद्रातील सरकारचं आहे त्यामुळे ही लोकशाही नाही. मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.