काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ’50 खोके एकदम ओके’ फेम गोरंट्याल यांच्यासह 23 उमेदवारांची घोषणा

  • Written By: Published:
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ’50 खोके एकदम ओके’ फेम गोरंट्याल यांच्यासह 23 उमेदवारांची घोषणा

Congress releases second list of 23 candidates for Maharashtra election :विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत काही विद्यमान आमदारांची नाव यादीत असली तरी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापून हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कुणा कुणा मिळाली संधी? 

– भुसावळ- राजेश मानवतकर

– जळगाव – (जामोद) – स्वाती वाकेकर

– अकोट – महेश गंगाणे

– वर्धा  – शेखर शेंडे

– सावनेर – अनुजा केदार

– नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

– कामठी- सुरेश भोयर

– भंडारा- पूजा ठावकर

– अर्जुनी मोरगांव – दिलीप बनसोड

– आमगाव- राजकुमार पुरम

– राळेगाव- वसंत पुरके

– यवतमाळ – अनिल मांगुळकर

–  अर्णी (अज) – जितेंद्र मोघे

– उमरखेड (अजा) – साहेबराव कांबळे

– जालना – कैलास गोरंट्याल

– औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख

– वसई – विजय पाटील

–  कांदिवली पूर्व – काळू बधेलिया

–  चारकोप – यशवंत सिंग

–  सायन कोळीवाडा – गणेश यादव

–  श्रीरामपूर (अनुसूचित जाती) हेमंत ओगले

–  निलंगा – अभयकुमार साळुंखे

– शिरोळ – गणपतराव पाटील

मविआकडून १९६ उमेदवार जाहीर

यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 80 तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसकडून 71 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार महाविकास आघाडीने आतापर्यंत 196 उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी 90 जागा असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर, 18 जागा या मित्रपक्षांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

बावनकुळे-भोयर यांच्यात होणार लढत

भाजपकडून विधानसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसकडून या मतदारसंघात  सुरेश भोयर यांना उमेदवारी घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता कामठीमध्ये बावनकुळे विरूद्ध भोयर यांच्यात थेट कडवी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube