आंबेगावला गतवैभवाकडे नेण्यासाठी वळसे पाटलांचा विजय महत्त्वाचा; लेकीची बापासाठी भावनिक साद
घोडेगाव : वैभवी आंबेगाव तालुक्याला पुन्हा गतवैभवाकडे नेण्यासाठी दिलीप वळसे पाटलांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन वळसे पाटलांची लेक आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेच्या संचालिका पूर्वा वळसे पाटील यांनी केले आहे. त्या घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव शिरूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारानिमित्त पूर्वाताईंनी मतदारांची संवाद साधून, मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्या बोलत होत्या.
देवदत्त निकम म्हणजे आंबेगावातून उभं केलेलं बुजगावण; शरद सहकारी बँकेच्या अध्यक्षांची बोचरी टीका
उपस्थितांना संबोधित करताना पूर्वी वळसे पाटील म्हणाल्या की, आंबेगाव तालुका हा वैभवी, अग्रेसर तालुका आहे. एवढेच नव्हे तर, या तालुक्यात एकही सामान्य माणूस विकासापासून वंचित नाही. त्यामुळे भविष्यातही या तालुक्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती गरजेची असून, त्यासाठी दिलीप वळसे पाटलांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत बहुमताने विजयी करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
Video : मोठं मोठी कामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटलांमध्येच; आढळरावांची तुफान बॅटिंग
आंबेगाच्या विकासामागे वळसे पाटलांची दूरदृष्टी
पुढे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, आज जो आपला आंबेगाव तालुका विकसित दिसत आहे, त्यासाठी दिलीप वळसे पाटलांची अहोरात्र मेहनत आणि दूरदृष्टी आहे. माझा तालुका सधन व्हावा, सामान्य माणूस सुखी व्हावा म्हणून साहेबांनी वेळप्रसंगी कुटुंबाकडे व स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले.
विजय तर वळसे पाटलांचाच; भेटीदरम्यान आढळरावांनी जयंत पाटलांना सांगून टाकलं
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केल्याचे सांगत तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी तालुका जपला आणि त्यामुळेच आपल्या आंबेगाव तालुक्याला सोन्याचे दिवस आलेत. हे सर्वांनी विसरू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्ना गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष क्रांतीताई गाढवे, अमोल काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेठ काळे, ज्योतीताई घोडेकर, रूपाली झोडगे, अश्विनी तिटकारे, अक्षदा शिंदे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.