Video : पवार साहेबांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय; भाकरीचा संदर्भ देत फडणवीसांची टोलेबाजी

  • Written By: Published:
Video : पवार साहेबांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय; भाकरीचा संदर्भ देत फडणवीसांची टोलेबाजी

कराड : शरद पवारांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते कराडमध्ये मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. विरोधकांनी एखादी चांगली गोष्ट सांगितली की ती घ्यावी असेही फडणवीस म्हणाले. पवारांच्या मंत्राप्रमाणे कराड उत्तरमधी जनता भाकरी फिरवणार असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, मागच्याकाळामध्ये राजकारणावर बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) असे म्हणाले की, तव्यावरची भाकरी योग्यवेळी फिरवली नाही तर, ती करपते. त्यामुळे आता पवार साहेहबांना सांगी की, उत्तर कराडमधील तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे नाही तर, आमचं उत्तर कराड करपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पवार साहेबांनी दिलेला मंत्र उत्तर कराड जगणार आहे आणि भाकरी फिरवून मनोजदादांना मुंबईच्या विधानसभेत पोहचवणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

विधानसभेच्या रणधुमाळीत सुप्रीम कोर्टाचा अजितदादांना 36 तासांचा अल्टिमेटम; वाचा नेमकं काय घडलं?

कराडची भूमी ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशी भूमी आहे. एक मोठा इतिहास असून, या इतिहासात महाराष्ट्राची जडण-घडण आहे. पण दुर्देवाने गेली 25 वर्ष उत्तर कराड ज्या प्रकारच्या विकासची अपेक्षा करतो. ज्या प्रकारचं परिवर्तन अपेक्षित करतो आणि वारंवार लोकप्रतिनिधी पाठवतो ती अपेक्षामात्र कुठेही पूर्ण होताना दिसत नसल्याचे फडणवीस म्हणाले. यासाठी गेल्या दोन निवडणुका कुणी जबाबदार असेल तर ते तुम्ही नाही आम्ही आहोत. तुमच्या मनात परिवर्त होतं. पण तुमच्या परिवर्तनाचा एक केंद्रबिंदू आम्ही तयार करू शकलो नाही आणि म्हणून परिवर्तन घडलं नाही.

माझ्या गोपीचंदला विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो : फडणवीस

दोन्ही निवडणुका आमचे मनोजदादा आणि ध्यैर्यशीलदादा एकमेकांच्या समोर आले आणि तिसऱ्याचा फायदा झाला. मात्र, यावेळी निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनोजदादा आणि ध्यैर्यशीलदादा असतील सर्वांना एकत्रित आणलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला खरचं परिवर्तन हवं आहे का? त्यावर सर्वांनी होकार दिला. पण यासाठी कुणाला तरी एकला त्याग करावा लागेल आणि एकाला पुढे न्यावं लागेल असे सांगितले. त्यानंतर सर्वांनी मिळून ठरवलं की, आम्ही त्याग करू आणि मनोजदादाला पुढे नेऊ आणि त्याला परिवर्तनाचा चेहरा करू असे सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube