Ladaki Bahin Yojana : ‘…तर लाडक्या बहिणी लाटणे घेऊन मागे लागतील’; भुजबळांचे विधान
Ladaki Bahin Yojana : महायुती सरकारने (Mahayuti) यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) महिलांकरीता अंमलात आणली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातत. याच योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ही योजना निवडणुकीपुरती असून निवडणुकीनंतर ही योजना महायुती सरकार बंद करेल, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं.
Video : पवार साहेबांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय; भाकरीचा संदर्भ देत फडणवीसांची टोलेबाजी
छगन भुजबळ यांची आज येवल्यात सभा झाली. या सभेत बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महायुती सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. महिलांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले. वडिलांच्या नावासाोबत आईचं नाव लावावं, हा निर्णय देखील महायुतीचा आहे, असं भुजबळ म्हणाले.
पुढं ते म्हणाले, हिंदु धर्मात विद्येची देवता सरस्वती आहे. पण मुलींना शिकवलं जात नाही. शौर्याची देवता आईभवानी आहे, पण महिलांना बाहेर पडू दिलं जातं नाही. संपत्तीची देवता लक्ष्मी देवी आहे, पण घरातल्या लक्ष्मीच्या हातात साधे दहा रुपये देखील दिले जात नाही. मात्र, महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना दहमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला. आजवर 2 कोटी 70 लाख भगिंनींना पैसे दिले. मात्र, आमचे विरोधक म्हणतात महायुती सरकार सत्तेवर आलं तर योजना बंद करणार. ही योजना केवळ निवडणुकीपुरती आहे. खरंतर ही योजना निवडणुकीपुरती नाही. आम्ही निवडून आल्यावर ही योजना बंद केली तर 2 कोटी महिला लाटण हातात घेऊन बाहेर पडल्या तर आमचा एकतरी माणूस बाहेर पडेल का, असा सवाल भुजबळांनी केला.
स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत, सुशीला – सुजीत चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
भुजबळ म्हणाले, एवढचं नाही तर कालच मुख्यमंत्र्यांनी, या योजनेत वाढ करू असं सांगितलं. महायुती सरकारच्या काळात कामं तर चिक्कार झाली आहेत. राज्यातला पहिला ब्रॉन्झचा गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा व्हि. एन. नाईक शिक्षण संस्थेत आपण उभारला, असं भुजबळ म्हणाले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधक जातीचे विष पेरत असल्याचा आरोप केला. ज्यांच्याकडे बोलण्यासारखे आणि करण्यासारखे काहीही नसते, ते निवडणुकीत जातीचा आधार घेतात. आपण मात्र सर्वांसाठी काम करतो, असं भुजबळ म्हणाले.