मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार…

  • Written By: Published:
Raj Thackeray

MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन (Maharashtra Navnirman Sena) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. मनसेच्या तिसऱ्या यादीत 13 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत.

Sanjay Raut : ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत मोठा घोळ, उमेदवार बदलले जाणार? 

या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर आणि ठाणे येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.या यादीत मंगेश पाटील यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील आणि चाकूरमधून नरसिंग भिकाणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभेसाठी मविआचा अधिकृत फॉर्म्युला ठरला; पत्रकार परिषदेत घोषणा 

मनसेच्या तिसऱ्या यादीत कोण?
1. अमरावती- पप्पू उर्फ ​​मंगेश पाटील
2. नाशिक पश्चिम- दिनकर पाटील
3. अहमदपूर-चाकूर- नरसिंग भिकाणे
4. परळी- अभिजित देशमुख
5. विक्रमगड-सचिन शिंगडा
6. भिवंडी ग्रामीण- वनिता कथुरे
7. पालघर-नरेश कोरडा
8. शहादा- आत्माराम प्रधान
9. वडाळा- स्नेहल सुधीर जाधव
10. कुर्ला- प्रदीप वाघमारे
11. ओवळा माजिवडा-संदीप पाचंगे
12. गोंदिया-सुरेश चौधरी
13. पुसद अश्विन जयस्वाल

या वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्या प्रमाणे मनसेने एकला चलोची भूमिका कायम ठेवली आहे. मनसेने सर्वप्रथम 7 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर काल मनसेकडन 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. अमित ठाकरे मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

आज मनसेने 13 उमेदवारांची नावे जाहीर केली. मनसेने आतापर्यंत 65 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांनी अभिजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

 

follow us