आदिवासी बांधवांच्या पाण्याच्या प्रश्नावर काम करणार; वळसे-पाटलांचा गावभेटीवेळी शब्द

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 11 02T153634.841

Dilip Walse Patil On Tribal Society Farmer Water Issue : पुढील पाच वर्ष फक्त पाणी प्रश्नावर काम करणार आहे, असा शब्द सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आदिवासी बांधवांना दिला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी बांधवांच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हातारबाची वाडी येथे गावभेट दौऱ्यात बोलत होते.

विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात

गावभेट दौऱ्यात संवाद साधताना वळसे पाटील म्हणाले की, जिथे लिफ्ट होईल तेथे लिफ्ट आणि जेथे लिफ्ट शक्य नाही तिथे तलाव निर्माण केले जातील. आदिवासी भागांमध्ये भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये असणाऱ्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईंना सामोरे जावे
लागत होते.

दिवंगत नेते आर. आर. (आबा) पाटील ग्रामविकास मंत्री असताना खडकातील टाक्यांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे आज आदिवासी भागातील आदिवासी भगिनींच्या डोक्यावरचा हंडा खाली आला आहे. त्याचप्रमाणे ते तेरुंगण पाझर तलाव, गोठेवाडी तलाव, असाणे येथील पायरडोह तलाव यामुळे आदिवासी भागाला पाणी देता आले.

शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही

डिंभे धरण भरलं व पाणी खाली सोडलं की धरणाच्या कडेच्या लोकांना पाणी राहत नव्हते. ती पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपण धरणाच्या क्षेत्रात बुडीत बंधारे बांधले त्याचा उपयोग आजही होतोय. बुडीत बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रश्न मी मंत्रीमंडळात मांडला असून, तेही काम
लवकरच मार्गी लागणार आहे.

माझी निवडणूक पवारांच्या विरोधात नाही

वळसे-पाटील म्हणाले की, माझी निवडणुक पवार साहेबांच्या विरोधात नाही तर, निकमांच्या विरोधात आहे. पवार साहेब हे आमच्या आदरस्थानी होते व आहेत आणि राहतील. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हिरड्यांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे वनविभागाने केले असून, यासाठी चौदा कोटी मंजूर झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होते मात्र, आज आपण सत्तेत असताना हिरड्याला मोठ्या प्रमाणात भरपाई देऊ शकलो.

शाश्वत विकासकामांमुळे आपला अष्टविजय निश्चित; वळसे पाटलांना पूर्ण विश्वास

सहावे ज्योतिर्लिंग असणारे क्षेत्र भीमाशंकर येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक भक्त पर्यटक व निसर्गप्रेमी हे येत असतात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी १४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला परंतु वनविभाग ह्यांच्या काही कडक कायद्यांमुळे हा विकास आराखडा लवकरात लवकर पुढे जाऊ शकला नाही. यावेळी आदिवासी आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे, संजय गवारी प्रकाश घोलप शरद बँक संचालक मारुती लोहकरे, नंदकुमार सोनावले यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us