अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मोदी आडनावाचा अवमान केल्याच्या खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुजरातच्या सूरत सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झालाय.या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 13 एप्रिलला होईल. “…त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं” म्हणून अजितदादांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज सुरत सत्र न्यायालयात दोन […]
उत्तर प्रदेशात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळून काय होणार? असा खोचक सवाल समाजवादी पार्टीचे आमदार नवाब इकबाल मेहमुद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नसल्याचा निर्णय योगी सरकारकडून घेण्यात आला आहे. Eknath Shinde : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीनगरमध्ये बसले भारताचा इतिहास […]
मुंबई : उद्धव ठाकरेंचं आजच्या सभेतलं भाषण वैफल्यग्रस्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड पचवू शकत नसल्याची टीका भाजपचे नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय. या टीकेला प्रविण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कितीही ‘गौरवयात्रा’ काढल्या […]
छ. संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत ठामपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरची पहिल्यांदा कोणी घोषणा केली होती? हे स्पष्ट केलंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. Udhav Thackeray : जगातला शक्तिमान नेता अन् हिंदू पंतप्रधान असूनही… […]
छ. संभाजीनगर : हिंदू पंतप्रधान असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे का काढावे लागतात? असा खोचक सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाहांवरही टीकेची तोफ डागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु […]
छ. संभाजीनगर : आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो पण तुम्ही मिंधे गटाचे काय चाटत आहात? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर टीकेची तोफ डागली आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या वज्रमूठ सभेची अनेकांना उत्सुकता लागलेली असताना अखेर उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु झालं आहे. या सभेत भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना चांगलंच झोडपलंय. या सभेला […]
छ. संभाजीनगर : आजची विराटसभा पाहिल्यानंतर तुम्ही कितीही गौरवयात्रा काढल्या तर आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचं थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधान शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून केलंय. आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत अशोक चव्हाण बोलत आहेत. सभेत भाषणाच्या सुरवातीलाच चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना झोडपल्याचं दिसून आलंय. […]
छ. संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या आजच्या सभेत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी दांडी मारली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित झाले आहेत. नाना पटोले यांनी प्रकृती अत्यवस्थ असल्याचं कारण दिल्याची माहिती आहे. मात्र, सभेला पटोले आले नसल्याने राजकीय […]
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या दिवशी घडलेल्या दंगलीत पीएफआय संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दंगलीप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 28 जणांना अटक केली असून 50 ओळख पटली असल्याची माहिती पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. ‘सरकार नपुंसक.. कोणीही या काहीही बोला’; बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा संताप पीएफआयशी संबंधित एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीही चौकशी […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sambhaji Nagar Riots) घडलेल्या दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राम नवमीच्या दिवशी संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झालं होतं. त्यानंतर दगडफेक आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले. रामायणचे अभिनेते […]