अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
मी विधानपरिषदेत समाधानी आहे, पण विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नसल्याचं मोठं विधान आमदार सत्यजित तांबे यांनी लेटस्अप मराठीच्या लेटस्अप चर्चा या कार्यक्रमात केलंय.
मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय. या चार्जशीटमध्ये अरविंद केजरीवाल घोटाळ्याचा सुत्रधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलीयं.
वरळी प्रकरण हिट अॅंड रन नाही तर खूनच, असल्याचं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत.
मराठा समाजाचे २-4 माकडं फडणवीसांच्या बाजूने बोलून समाजात नाराजी पसरवत असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलीयं. ते लातूरमध्ये बोलत होते.
छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करत, असल्याची जळजळीत टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर केलीयं.
मुंबईतील हिट अॅंड रन प्रकरणातील मुलगा बलात्कारी आहे की अतिरेकी? असा थेट सवाल करत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंयं.
समृद्धी महामार्गाच्या कामात 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलायं. ते मुंबईत बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
एक नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो तर दुसरा नातू अंबानींकडे नाचतो, अशी सडकून टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर केलीयं.