विधानसभा निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत, निकालाच्या दिवशी महायुतीच्याच आयटम बॉम्बचा धमाका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलायं.
महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. जळगावात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच कोपरगाव मतदारसंघातील स्नेहलता कोल्हे कुटुंबियांना राज्यसभेची ऑफर असल्याची माहिती समोर आलीयं.
आमचं नेमकं कुठं चुकलंय, आपण मुद्द्यांवर लॉजिकल चर्चा करु, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना केलंय. ते पुण्यात बोलत होते.
जयश्री थोरात नासमज, त्यांनी वडिलांकडून धडे घ्यावेत, असा खोचक सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांना दिलायं.
माझ्या बापाविषयी बोलाल तर...ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार या शब्दांत बाळाासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांनी सुजय विखेंना थेट इशारा दिलायं. युवक काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडुंनी नवनीत राणांना पाडायची सुपारी घेतली होती, या शब्दांत आमदार रवि राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल चढवलायं.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालायं. आश्रमात दोन मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या वडिलांकडून करण्यात आला होता.
महिला बाल व विकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं असून यासंदर्भातील माहिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिलीयं.
भाजपात तिकीट मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, पण कोणी बंडखोरी करेल अशी परिस्थिती भाजपात नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.