…तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल; असीम सरोदेंनी दिला ‘माळवणकर’ नियमाचा दाखला

…तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल; असीम सरोदेंनी दिला ‘माळवणकर’ नियमाचा दाखला

Asim Sarode News : राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठरवलं तर ते गणेश माळवणकर नियमाच्या आधारे कमी आमदार संख्या असली तरीही विरोधी पक्षनेता निवडू शकतात, असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेता (Opposition Leader) बनण्याचीही संधी मिळणार नाही, एवढ्या जागा निवडून आल्याने आता विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल की नाही? याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने असीम सरोदे यांच्याशी संवाद साधलायं.

परभणीतील हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार? सुषमा अंधारेंनी केला गंभीर आरोप…

असीम सरोदे पुढे बोलताना म्हणाले, विरोधी पक्षनेत्याचा पायंडा गणेश वासुदेव माळवणकरर यांच्या नियमाच्या आधारे अलिखित स्वरुपात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 1962 पासून ते 1972 पर्यंत कमी आमदार संख्या असली तरीही विरोधी पक्षनेता निवडण्याचा मोठेपणा दाखवण्यात आलो होता. आत्ताही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्यास विरोधी पक्षनेत्याची निवड करु शकतात, असं असीम सरोदे यांनी स्पष्ट सांगितलंय.

आज ‘या’ राशींचे चमकणार नशीब, आर्थिक लाभासह नोकरीचा योग; विवाह योग आलाय जुळून

तसेच विरोधी पक्षनेत्याला मंत्र्याचा दर्जा आणि त्यांना प्राधान्यक्रमाने प्रश्न विचारता येतात, विरोधी पक्षनेत्याने चर्चेची मागणी केल्यास चर्चा होतेच. विरोधी पक्षनेता नसेल तर अपारदर्शकता होऊ शकते, त्यासाठी विरोधी पक्षनेते पद असलं पाहिजे, विरोधीपक्षनेता दिला नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत हा नेता दिसणारच नाही
महाराष्ट्राचं राजकारण युपी, बिहारसारखं नाही सर्वसमावेशक असून 1962 ते 1967 दरम्यान, शेकापचे कृष्णराव नारायण धुरव हे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांचे फक्त 15 आमदार होते, त्यानंतर ते 1967 ते 1972 तेव्हाही झाले तेव्हा त्यांचे 19 आमदार होते. त्यानंतर दिवा पाटील झाले तेव्हा फक्त 7 आमदार होते, त्यानंतर अनुक्रमे बबन ढाकणे, दत्ता पाटील, मृणाल गोरे यांचा इतिहास पाहिला तर राजकीय परिपक्वता, व्यापकता वेगळी असल्याचं असीम सरोदेंनी स्पष्ट केलंय.

मोहनलालच्या ‘बॅरोज’चा ट्रेलर आऊट, चित्रपट 3D अनुभवाच्या सहाय्याने वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार

राहुल नार्वेकरांनी सर्वांनाच न्याय दिलायं…
भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झालीयं. त्यांची मागील कारकिर्द चांगली राहिली असून अपात्र आमदार प्रकरणी त्यांनी सर्वांनाच न्याय दिला आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नसल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube