अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
1 जुलैपासून राज्यात दुधाला 30 रुपयांचा भाव आणि 5 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दुध उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेस पक्षाला जागा दाखवलीयं. ते लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुरीत झालेल्या रास्ता रोको आंदोलनात केलीयं.
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीयं.
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
संसदेत राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केलं होतं.
परमात्मा थेट पंतप्रधान मोदींच्या आत्म्याशी बोलतो, या शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले आहेत. ते संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत होते.
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.