अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पायउतार करुन सचिन जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीयं. त्यामुळे सातपुते वेगळी भूमिका घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उशिरा का होईना आता भाऊ-बहीण आठवली असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही, असा पलटवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर केलायं.
मराठा बांधवांनो तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका, मीच तुमच्या जिल्ह्यात असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आवाहन केलंय. येत्या 6 जुलैपासून जरांगे राज्यभर दौऱ्यावर असणार आहेत.
कालीचरण महाराजांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी लेखी दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलीयं.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ कायदेशीर बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत आज पाथर्डी तालुक्यात ओबीसी मेळावा पार पडला.
राज्य सरकारकडून मागणी मान्य होईल वाटत नाही, आता आम्ही ताकदीने उठाव करणार असल्याचं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी क्लिअर सांगितलं आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना अजितदादांच्या खासदाराने लोकसभा गाजवलीयं. सुनिल तटकरे शुभेच्छा देताना अमित शाहांसह राजनाथ सिंहही ऐकत राहिल्याचं दिसून आलं.
माजी खासदार सुजय विखे यांनी दिलेल्या चॅलेंजनंतर खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत पूर्ण करुन दाखवलंय. लंके यांनी राजकीय खुन्नसपोटी हा सगळा पराक्रम केला की काय? अशी चर्चा रंगलीयं.