अहमदनगर शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणावे लागणार आहे, राज्य सरकारकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलीयं.
पुण्यात राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Rahul Gandhi News : हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता तर हरियाणात पुन्हा भाजपने बाजी मारलीय. काँग्रसेला हरियाणात जेमतेम 38 जागा मिळाल्या आहेत. या निकालावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीयं. जम्मू काश्मीरच्या लोकांचं धन्यवाद आणि हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत असल्याचं राहुल गांधी […]
पुतळ्यासाठी मी जागा उपलब्ध करुन देणार असा शब्द आमदार आशुतोष काळे यांनी दिला होता. अखेर आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळत भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केलीयं.
सत्तेत नसल्याने काँग्रेसची अवस्था तडपत्या माशासारखी झाली असल्याची खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलीयं. जम्मू काश्मीर, हरियाणाच्या निवडणूक निकालानंतर ते दिल्लीत बोलत होते.
बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलीयं.
हरियाणासारखंच महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला वनसाईड बहुमत मिळणार असल्याचा फुल कॉन्फिडन्स माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलायं.
गुजराथी ठगाने गुजरात आणि देशामध्ये एक भिंत बांधली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
राहुरी मतदारसंघातील कुरणवाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मतदारसंघात कर्डिलेंची ताकद वाढलीयं.