माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीयं. संजना जाधव यांच्या वाहनाला पिकअपने धडक दिल्याने अपघात घडला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागांमध्ये अदला-बदल होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
लादेन जन्मत: दहशतवादी नव्हता, समाजामुळे दहशतवादी बनला असल्याचं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केलंय.
तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खडसावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
नवरात्र उत्सवाच्या आधीच जागावाटप पार पडणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून सांगण्यात आलंय. अहमदनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी लावून धरली असून भाजपला जागा गेल्यास राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरला रेड अलर्ट देण्यात आलायं.
रोज मरे त्याला कोण रडे, मनोज जरांगे सारखेच उपोषण करतात सरकारला तेवढचं काम आहे का? असा खोचक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलायं.
मंत्री धनंजय मुंडे यांना चीतपट करण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला असून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी तुतारी फुंकलीयं.