पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी क्लिअर सांगितलंय. सांगलीत आयोजित सभेत ते बोलत होते.
आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून गोदावरी नदीवरील कोल्हापुर टाईप बंधाऱे, केटीवेअर संरक्षक भिंतींच्या दुरुस्तीसाठी 19.63 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालीयं.
बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मनोज जरांगे यांच्या नावाची घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केलीयं. ते हिंगोलीत बोलत होते.
संगीताच्या माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न, असल्याचं मत गायक आयुष्यमान खुरानाने आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त मांडलंयं.
महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलंय.
मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडून तिसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून सरकारने अहवाल स्विकारलायं.
अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात शरद पवार गटाच्या गळाला लागणार असल्याची शक्यता आहे, तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं थोरातांनी सांगितलंय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
बारामतीमधील चतुरचंद कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडलीयं.