अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.
शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केलायं.
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून आता उदयनराजे भोसले राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोयं.
Solapur Loksabha : सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना भाजपच्या राम सातपुतेंना धूळ चारलीयं. अखेरच्या फेरीत प्रणिती शिंदे 81 हजार 149 च्या लीडने पुढे आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांचा एक लाखांच्या लीडने पराभव केलायं.
अयोध्येतून भाजपचे उमदेवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला असून सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांची सायकल सुसाट पळालीयं.
हातकणंगलेच्या चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने यांनी गड कायम राखत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांना पराभत केलंय.
उत्तर प्रदेशात भाजप 32 जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीची सायकल सुसाट पळत असल्याचं दिसून येत आहे. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्याची आकडेवारी समोर आलीयं.
कोल्हापुरकरांनी छत्रपतींच्या गादीलाच मत दिलं असून छत्रपती शाहु महाराज यांनी एक लाखांच्या लीडने महायुतीचे उमदेवार संजय मंडलिकांचा पराभव केलायं.
सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.