महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
छगन भुजबळ तुला चष्मा उचलना...तलवार कधी उचलायची, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर खोचक टोलेबाजी केलीयं. ते अहमदनगरमधून शांतता रॅलीत बोलत होते.
पश्चिम बंगालमधील कोलकत्त्यामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करुन अमानवी पद्धतीने हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी एसआयटीने तपास करुन आरोपीला अटक केलीयं.
मी शरद पवारांसोबत...पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात, असं विधान भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय.
मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
विरोधकांंना विरोध करायचायं म्हणून ते करीत आहेत, पण लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणारच या शब्दांत अदिती तटकरे विरोधकांना सुनावलंय.
संजय राऊत यांच्या स्टाईलने बोलला तर उत्तरंही तशीच येणार असल्याचा खोचक टोला मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.
अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबात काँंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलंय. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
परमबीर सिंह खोटारडे, दिशाभूल करताहेत, असं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी दिलंय.