विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आपला जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जाहीरनाम्याला 'जोशाबा समतापत्र' असं नाव देण्यात आलंयं.
वडगाव शेरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांची ताकद वाढली असून उपसरपंच प्रीतम खांदवे पाटलांनी पाठिंबा जाहीर केलायं.
तिवसा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडलायं.
निवडणूक काळात पोलिस विभागाच्याही गाड्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहायची लायकी आहे का? या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले आहेत.
पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलायं.
प्राजक्त तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली असल्याची सडकून टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केलीयं.
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीयं.
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.