शेतीच्या वादातून हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांना जामीन मंजूर झालायं.
मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, या शब्दांत खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी तलवार उपसलीयं.
तुम्हाला गाड्याच फोडायच्या असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा, असं आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. परभणीत आयोजित सभेत ते बोलत होते.
मी आज उद्या अन् भविष्यातही आहे इथंच अजित पवार गटात राहणार असल्याचं सांगत आमदार नरहरी झिरवळ यांनी ठासून सांगितलं. नाशिकमधील सुरगाण्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
10 मीटरमध्ये कांस्यपदक पटाकवल्यानंतर भारतीय नेमबाज मनु भाकर 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या पात्रतेत उतरलीयं. या पात्रता स्पर्धेत पात्र ठरल्यास आणखी पदक गळ्यात पाडून घेण्याची शक्यता आहे.
'वंदे भारत मेट्रो'मध्ये नाशिक, मुंबई, पुण्याचा विचारा व्हावा, असं साकडं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे घातलंय. दरम्यान, रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मोहोळ यांनी वैष्णव यांची भेट घेतलीयं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा दावा केला जात असतानाच खुद्द फडणवीस यांनी सेफ उत्तर दिलंय. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हे सरकार म्हणजे एक टोळी असून टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर संताप व्यक्त केलायं. दरम्यान, राज्यातील आमदारांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर संजय राऊत बोलत होते.
आवश्यक कागदपत्रे जोडूनही ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसळेला राज्य सरकाकडून एकही रुपया मिळाला नसल्याची खंत मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी व्यक्त केलीयं.
Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने हमवतन एच.एस प्रणॉयवर मात करत उपांत्यपूर्व दाखल झाला आहे.